लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आॅनलाइन औषधविक्री व ई पोर्टलवर नोंदणीच्या सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ३०) एकदिवसीय देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे़ या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते दुकानदार सहभागी होणार असून, सकाळी १० वाजता गोळे कॉलनीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक केमिस्ट असोसिएशनचे सचिव प्रशांत पवार यांनी दिली़देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाइन औषध विक्री सुरू करण्यात येणार असून, यामुळे सामाजिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे़ याबाबत केंद्र व राज्य सरकारला वेळोवेळी निवेदने देऊनही त्यांनी आॅनलाइन औषधी पुरवठ्याची गंभीर दखल घेतलेली नाही़.
औषध विक्रे त्यांचा आज बंद
By admin | Published: May 30, 2017 12:57 AM