सिन्नर : मतमोजणीच्या दिवशी परमिट रूम व बिअरबार तसेच देशी दारू दुकान बंद राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अवैध विक्रीच्या उद्देशाने भंगार टेम्पोच्या खाली लपवून ठेवण्यात आलेला मोठा विदेशी व देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात वावी पोलिसांना यश मिळाले आहे. विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर त्याची मतमोजणी रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व दारू दुकाने रविवारी बंद असणार आहेत. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना वावी-निऱ्हाळे रस्त्यावर भंगार टेम्पोच्या खाली देशी व विदेशी मद्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात आल्याची गुप्त खबर मिळाली होती. संशयित आरोपी फरार झाला आहे. डिप्लोमॅट कंपनीच्या ६८, प्रिन्स संत्राच्या ३३६ बाटल्यांचे सात बॉक्स सापडले. पोलिसांनी विदेशी व देशी कंपनीच्या सुमारे १९ हजार रुपये कि मतीचा माल जप्त केला आहे. संशयित आरोपी शेख याच्याविरोधात अवैध दारू विक्रीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला दारूसाठा जप्त
By admin | Published: October 19, 2014 12:47 AM