इगतपुरीत रेव्ह पार्टी : कंपनीच्या संचालकासह सात युवती ताब्यात
घोटी : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी छापा टाकत उधळली. कारवाईत पुण्यातील खतनिर्मिती करणाºया कंपनीच्या अधिकाºयांसह सात अल्पवयीन युवतींना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून पार्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट हॉटेलात काही युवक, युवती अर्धनग्न अवस्थेत नृत्य करीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांसह सरपंच कैलास भगत यांनी इगतपुरी पोलिसांना दिली. पोलीस पथकाने छापा टाकला असता बंदिस्त खोलीत पुणे येथील जी.एम.बायोसीड्स या खते, बियाणे उत्पादन करणाºया कंपनीच्या संचालकासह अन्य युवक आणि सात अल्पवयीन युवती डीजेवर अर्धनग्न अवस्थेत मद्याच्या नशेत नृत्य करीत होते. (पान ५ वर)दरम्यान, सायंकाळी उशिरा अल्पवयीन युवतींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, अटकेतील संशयिताना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून पार्टीसाठी वापरण्यात येणारी साउण्ड सिस्टिम, पिकअप वाहन (क्र. एमएच १५ डीके ७७३६) व मुलींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी एक विनाक्रमांकाची कार ताब्यात घेतली आहे. शिवाजी लोहरे यांनी फिर्याद दिलीे. उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, महिला पोलीस अधिकारी रामेश्वरी पांढरे, पोलीस हवालदार शिवाजी लोहरे, मारुती बोराडे, विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी, हेमंत मोरे, प्रवीण सहारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.व्यवस्थापनावर गुन्हा नाहीया पंचतारांकित हॉटेलात गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीच्या पार्ट्यांचे विनापरवाना आयोजन करण्यात येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असताना अशा प्रकारांना अभय देणाºया हॉटेल व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खत कंपनीच्या डीलरची या हॉटेलात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर कंपनीच्या संचालकांनी रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी नाशिक व मुंबई येथून सात मुली आणण्यात आल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.पोलिसांच्या कारवाईवेळी संशयित फरारपोलिसांनी प्रशांत काशीनाथ सोंडकर (२७) रा. दीडहार, ता. भोर, जि.पुणे, विश्वास विठ्ठल सोंडकर (४५) रा. मांगलेवाडी, कात्रज, पुणे, गंगाधर भाऊसाहेब शिंदे (४२) रा.मानोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, अनंत हरिहर भाकरे (५१) रा.कॉलेज रोड, नाशिक व उमेश जिभाऊ शेवाळे या संचालकांसह संजय वसंत सोनवणे (३८), प्रथमेश संजय सोनवणे (२०), रा.पाथर्डी फाटा, नाशिक, रामकृष्ण एकनाथ सांगळे (२०) रा.मोरवाडी, नाशिक यांच्यासह सात युवतींना ताब्यात घेतले. कारवाईवेळी उमेश शेवाळे हा संशयित फरार झाला.