शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आठवड्यात एक ‘ड्राय डे’

By admin | Published: November 30, 2015 11:54 PM

पाणीपुरवठा राहणार बंद : पाच तासांच्या चर्चेनंतर महासभेचा निर्णय, दोन महिन्यांसाठी अंमलबजावणी

नाशिक : राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात केल्याने उद्भवलेल्या जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी बोलविलेल्या विशेष महासभेत शहरात दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवत डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पाणीवापराबाबत नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचेही यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले. सुमारे पाच तास चाललेल्या चर्चेत भाजपा वगळता सर्व सदस्यांनी अंगात काळे डगले घालत शासनाचा आणि पालकमंत्र्यांचाही निषेध नोंदविला.मागील आठवड्यात २३ नोव्हेंबरला मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अद्याप या निर्णयाचे लेखी आदेश महापालिकेकडे प्राप्त झालेले नाहीत. मात्र, महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात झाल्याने येत्या काळात उद्भवणाऱ्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी नियोजन आणि उपाययोजनांसंबंधी विशेष महासभा बोलाविली होती. यावेळी सुमारे ४० नगरसेवकांनी पाणी नियोजनासंबंधी उपाययोजना सुचवितानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता शासनाकडे दादही मागण्याचे ठरविण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी सध्याची एकवेळ पाणीकपात सुरू ठेवली तरी शहराला ८८ दिवस पाणी कमी पडणार असल्याची वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडली, तर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बाष्पीभवनामुळे होणारे पाणी वगळून शासनाने पाण्याचे आरक्षण केल्याचे आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, शासनाने महापालिकेवर कृत्रिम पाणीटंचाई लादली आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी पडणार असल्याने शहरातील विहिरी अधिग्रहित करण्यात याव्यात, जुन्या विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, टॅँकरची संख्या वाढवावी, शहरात ठिकठिकाणी बोअरवेल्स करावेत, सद्यस्थितीतील बोअरवेल्सवर जलपऱ्या बसविण्यात याव्यात, बांधकामांसाठी लागणारे पाणी त्वरित बंद करावे, प्रत्येक उद्यानात बोअरवेल्स करावेत, गंगापूर धरणातील गाळ काढण्यात यावा, किकवी धरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, जुन्या पाइपलाइन बदलण्यात येऊन पाणी गळती रोखावी, अशा सूचना करण्यात आल्या.