त्र्यंबकेश्वर परिसरात हर्षकिल्ला, अंजनेरी गड, त्र्यंबक गड, हत्ती दरवाजा, ब्रम्हगिरी, गंगाद्वार दुगारवाडी धबधबा, लेकुरवाळी धबधबा, नयनमनोहर आणि धुक्याची चादर पांघरलेला विलोभनीय असा अंबोली घाट तसेच आदिवासी गावांची नागमोडी वळणे घेत वाहनांमधून सृष्टीसौंदर्याचा खजिना नजरेत भरण्यासाठी नेहमीच गर्दी असते. याबरोबरच पहिनेचा नेकलेस धबधबा, अंजनेरीचे उलटे धबधबे अशी रमणीय स्थळे देखील आकर्षण ठरत असतात. गेल्या दीड वर्षापासून पोलीस आणि वन विभाग यांनी संयुक्तरित्या मोहीम उघडून पर्यटकांना या पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव केला आहे. यासाठी त्र्यंबक पोलीस, वाडीवऱ्हे पोलीस आणि घोटी पोलीस, याबरोबरच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक वन विभाग आदींनी फलक लावून या परिसरात पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे. तरीही पर्यटक घुसखोरी करत वीकेंड साजरा करताना दिसून येत आहेत.
वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांचा खुश्कीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:10 AM