सुरगाणा : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सुरगाणा व बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोविड - १९ अंतर्गत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांनी कोरोना लसीकरणा बाबत उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, सेविका व्हॅक्सीनेटर यांना संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले.याप्रसंगी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, प्राथमिक आरोग्य केंद्र, पांगारणे येथील डॉ. चैतन्य बैरागी यांनी देखील मॉक ड्रील संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरक्षण कक्ष उभारणी करुन ड्राय रन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथील डॉ. सुरेश पांडोळे, डॉ. दिलीप रणवीर, डॉ. चैतन्य बैरागी, डॉ. कमलाकर जाधव, विस्तार अधिकारी एम. ए. अन्सारी, डॉ. कुमावत आदी उपस्थित होते.
कोविड - १९ अंतर्गत सुरगाणा तालुक्यात ड्राय रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 8:47 PM
सुरगाणा : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सुरगाणा व बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोविड - १९ अंतर्गत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाला.
ठळक मुद्देआरोग्यसेवक, सेविका व्हॅक्सीनेटर यांना संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले.