नाशिक : अंगारकी चतुर्थीनिमित्त शहर व परिसरातील गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती़ या वर्षातील ही द्वितीय अंगारकी चतुर्थी असून, ३ एप्रिल रोजी पहिली अंगारकी चतुर्थी होती़ भाविकांनी दिवसभर उपवास करत श्री गणेशाची आराधना करून मनोभावे पूजा केली़ प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशभक्त उपवास करतात़ मात्र मंगळवारी जर चतुर्थी आली तर त्यास अंगारकी असे म्हणतात़ ..म्हणून अंगारकी चतुर्थीनवश्या गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने पालखी काढण्यात आली होती. रविवार कारंजावरील सिद्धिविनायक चांदीचा गणपती, भद्रकालीतील साक्षी गणेश, अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती, रोकडोबा पटांगणावरील मोदकेश्वर, उपनगरमधील ईच्छामणी, डीजीपीनगरचे विघ्नहरण गणेश मंदिर यांसह गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होती़
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:10 AM