नाशिक : बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात शुक्रवारी (दि.२१) विविध १४ राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी संपावर गेल्याने संबंधित बँकांच्या जिल्हाभरातील सुमारे एक हजार शाखांमधील दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्यानंतर दुसºया दिवशी महिन्याचा चौथा शनिवार व तिसºया दिवशी रविवारची साप्ताहिक सुट्टी लागून आल्याने सलग तीन दिवस शहरातील बँका बंद राहिल्याने ग्राहकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ग्राहक आॅनलाइन बँकिं ग करीत असले तरी अजूनही रोख व्यवहार करणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहरातील बाजारपेठेवरही बँकांना सलग तीन दिवस सुटी असल्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. शुक्रवारच्या संपानंतर एकापाठोपाठ एक आलेल्या या तीन सुट्यांमुळे शहरातील कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार खोळंबले. नागरिकांनी आॅनलाइन बँकिंगप्रणाली स्वीकारली असली तरी अद्यापही अनेक ग्राहक या तंत्रज्ञानापासून दूर आहेत. तसेच अनेक ग्राहकांना डेबिट आणि क्रे डिट कार्डचा वापर करता येत नसल्याने अशा ग्राहकांची अधिक गैरसोय झाली.सोमवारी बँका उघडणार असल्या तरी मंगळवारी (दि.२५) ख्रिसमस आणि बुधवारी (दि.२६) पुन्हा एकदा बँक कर्मचाºयांचा संप असल्याने सोमवारीच बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
बँकांच्या सलग सुट्यांमुळे व्यवहार रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:06 AM