नाशिक : परपुरुषाशी बोलते, या कारणावरून सुनेला जाळणारी सासू हौसाबाई निवृत्ती माळेकर (५५, रा़ कापाची करंजाळी, ता़ दिंडोरी) हिला न्या. एम़एच़ मोरे यांनी मंगळवारी (दि़ १०) दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़हौसाबाई माळेकर व सून अनिता यांच्यात वाद होत असे. २५ एप्रिल २०१६ रोजी अनिता साफसफाई करीत होती़ संतप्त हौसाबाईने अनिताच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले व घटनेनंतर पळून गेली़ पती विलास व शेजारील नागरिकांनी अनिताला रुग्णालयात दाखल केले़ अनिताचा उपचारादरम्यान १ मे २०१६ रोजी मृत्यू झाला़ मृत्यूपूर्वी तिने सासूने पेटवून दिल्याचा जबाब दिला होता़ वणी पोलिसात सासूवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ अॅड़ विद्या जाधव यांनी १२ साक्षीदार तपासून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़ न्यायालयाने सासूला दोषी धरीत खुनाच्या गुन्ह्याऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
सुनेला जाळणाºया सासूला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:28 AM