पाटोदा : गेल्या दहा पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात हवामान बदल व झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे या पिकांवर मोठया प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्गाला पिके जगविण्यासाठी पिकांवर महागडी औषधे फवारण्याची वेळ आली आहे.आधीच शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असतांना पुन्हा ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. मागील आठवड्यात पाटोदा, ठाणगाव, कानडी, आडगावरेपाळ, विखरणी व परिसरातील काही गावांमध्ये बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकºााचे मोठे नुकसान झाले. हजारो क्विंटल कांदा या पावसाने भिजला.या भागात पाणी टंचाई असली तरी अनेक शेतकºयांनी कांदा व कांदा बियाणे तयार करण्यासाठी गुंठे दोन, गुंठे डोंगळे पिकाची लागवड केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून, थंडी, पाऊस, ऊन व ढगाळ वातावरण अशी स्थिती असल्यामुळे या पिकांवर मोठया प्रमाणात मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ही पिके जगविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकºयांनी पिकवलेल्या कोणत्याही पिकाला बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यात पुन्हा पिकांवरील रोगांनी डोके वर काढल्याने शेतकºयांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.गेल्या आठवडयात झालेल्या बेमोसमी पावसामुळे डोंगळा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, तसेच ढगाळ हवामानामुळे डोंगळे पिकावर मावा तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पुढील वर्षाच्या बियाणांसाठी हे पिक जगविणे गरजेचे असल्याने पिकावर महागडी औषधे फवारून पिके जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे.- वैभव भवर शेतकरी, ठाणगाव.
हवामान बदलामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 5:13 PM
पाटोदा : गेल्या दहा पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात हवामान बदल व झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे या पिकांवर मोठया प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्गाला पिके जगविण्यासाठी पिकांवर महागडी औषधे फवारण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देपाटोदा : रोगावर नियंत्रणासाठी शेतकरी वर्गाची औषध फवारणीसाठी धावपळ