नाशिक : गेल्या वर्षीच्या मोसमात काजुचे उत्पादनात झालेली घट आणि नवीन पीक बाजारात येण्यास उशीर झाल्याने काजूचे भाव कडाडले असून गतवर्षापेक्षा यंदा काजूचे दर प्रकिकिलो दोनशे रुपयांनी वधारले आहे. त्याचप्रमाणो हिवाळ्य़ाच्या पाश्र्वभूमीवर सुका मेवा खरेदी करणा:या ग्राहकांची संख्या वाढल्याने बेदाण्यांचेही भाव वधारले आहे. सुक्या मेव्यातील अन्य पदार्थाचे भाव मात्र स्थिर असून वाढत्या थंडीच्या पाश्र्वभूमिवर सुक्यामेव्याला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे.हिवाळा ऋ तूत आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारवरही लक्ष केंद्रित केले जाते. या मोसमात जीममध्ये जाणा:यांची संख्या वाढते. व्यायाम आणि वाढती भूक यांना पोषक असा आहार घेण्यासाठी डिंक, मेथी आदींपासून तयार केलेले लाडूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारिक, खोबरे आदींना प्रचंड मागणी असते. यंदाही थंडीचा प्रभाव जसजसा वाढू लागला आहे, तशी ड्रायफ्रूटची मागणी वाढू लागली आहे. हिवाळयात वाढणारी भूक आणि पचनशक्ती यांच्यामुळे खास पदार्थ बनविण्यात येतात. त्यात डिंक लाडू आणि मेथीचे लाडू यांचे प्रमाण जास्त असते. ते बनविण्यासाठी डिंक, खारिक, खोबरे, तुप आदींचा वापर केला जातो. पचणासाठी जड असणारे या पदार्थाचे हिवाळ्य़ात चांगले पचन होते. यामुळे हिवाळ्य़ात थंडीचे प्रमाण वाढले की अनेक कुटुंबामध्ये सुक्यामेव्यापासून विविध पदार्थ बनविण्याची लगबग दिसून येत आहे.ड्रायफ्रूटचे प्रतिकिलोचे भावखारा पिस्ता- 1000 रुपयेसाधा पिस्ता- 1600 रुपयेबदाम -870 रुपयेखोबरे-210 रुपयेआक्रोड-800 रुपयेअंजीर- 800 रुपयेखारीक-180 रुपयेकाळी खारीक- 250 रुपयेकिसमिस-250 रुपयेकाळा-400 रुपये