जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जलस्वराज्य प्रकल्पाची विहिर कोरडीठाक पडल्याने महिलांना गेली पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती, अखेर शासनाकडून टॅँकर सुरु झाल्याने महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.
गावातील विहीरी तळगाठला असून रानोमाळ हि साठवुन ठेवलÞेल्या पाण्यावर व प्रत्येक कुटुंबाला पुरेल इतकेच पाणी कुटुंबाकडे असल्याने ग्रामस्थांची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर अवलंबून होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच २८ मार्च रोजी प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी, प्रांत कार्यालय, पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला होता. गुरुवारी (दि.४) गावात टॅकर येताच महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.१५ वर्षांपूर्वी अनेक गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज्य प्रकल्प योजना राबविल्या गेल्या, पण पाण्याअभावी या योजना बंद पडल्या, तर काही ठिकाणी धुळखात अपुर्ण अवस्थेत बंद पडल्या, पर्यायाने तेव्हा सुरू असलेल्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतुन हि गावे वगळली गेली. पाऊस, पाणी, नदी नाले वाहिल्यास ठराविक कालावधीसाठी या ग्रामस्थांना पाणी मिळते पण? उन्हाळ्यात मात्र या गावांना आरक्षित पाण्याचा किंवा शासनाच्या टॅँकर अवलंबून रहावे लागते. पुरणगाव ग्रामपंचायतीने पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातुन येथील बंधारा भरण्यासाठी ठराव दिला होता पण तो नामंजूर करण्यात आल्याने गावाची सर्व अशा शासनाच्या टॅकरवर आवलंबून होती.पुरणगाव येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, असुन या पाणी टंचाईकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही, गटविकास अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे सतत पाठ पुरावा करु न अखेर पुरणगावासाठी गुरुवारपासुन शासनाच्या टॅकरने पाणी पुरवठा चालु झाला. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे.