निफाड : निफाड तालुक्यात रविवारी दि 7 रोजी दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे मागील 24 तासात या तालुक्यात 57 मिमी पाऊस झाल्याची नोंद कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात झाली.मागील बुधवारी दि 3 रोजी निफाड परिसरात दिवसभर पाऊस झाला होता मात्र गुरु वार, शुक्र वारी दोन्ही दिवस तुरळक पाऊस झाला होता मात्र शनिवारी पावसाने दमदार सुरु वात केली होती व दिवसभरात मधूनमधून कमीजास्त वेगाने पाऊस झाला होता अखेर रविवारी दि 7 रोजी सकाळपासून संततधार पावसास प्रारंभ झाला कधी संततधार तर कधी वेगाने या पावसाने दिवसभर हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गर्दी झाली होती. या दमदार पावसामुळे सोयाबीन ,मका पेरणी सुरू होतील आण िऊस लागवडीला वेग येईल असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र पावसाने उशिरा हजेरी लावल्याने यावर्षी सोयाबीनच्या पेरण्या उशिरा पेराव्या लागणार आहे शेतकरी वर्गाने सोयाबीन, मका बियाणांच्या खरेदीसाठी सुरु वात केली आहे.
संततधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 9:15 PM
निफाड : निफाड तालुक्यात रविवारी दि 7 रोजी दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे मागील 24 तासात या तालुक्यात 57 मिमी पाऊस झाल्याची नोंद कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात झाली.
ठळक मुद्दे शनिवारी पावसाने दमदार सुरु वात केली