नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांची आवक स्थिर असून, भावात एक-दोन रुपयांची चढ-उतार होत आहे. आवक कमी असल्याने वांगे तेजीत असून, फळांचे भाव आणि आवक स्थिर आहेत. गावठी कोथिंबिरीला शेकडा २००० ते ३६०० रुपयांचा, तर हायब्रीड कोथिंबीर १५००-२७०० रु. शेकडा या भावाने विकली गेली.
मेथीचे भाव अद्याप चढेच असून, २००० ते २८०० रुपये, सरासरी २४०० रुपये शेकडा या भावाने मेथीचा लिलाव होत आहेत. फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, भोपळा, कारले, दोडका, गिलके, बटाटा या फळभाज्यांमध्ये आवकेनुसार भावामध्ये एक-दोन रुपयांनी चढ-उतार होत असल्याचे दिसून आले. वांग्याचा दर ४००० ते ७००० रुपये क्विं टल आहे. फळ बाजारात सफरचंदाची आवक कमी होऊन भाव स्थिर आहेत. सफरचंदाला ५००० ते ८५०० क्विं टलचा भाव मिळत आहे.