पंचवटी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर जाणवला आहे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मेथी, कोथिंबीरसह अन्य सर्वच पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर जुडीला ५० रुपये, तर मेथीला २५ रुपये, असा बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा बºयापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यांत अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिलेली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.
पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 1:49 AM