हंसराज देसाई झोडगेचैत्र पौर्णिमेला होणाऱ्या नांदुरी येथील सप्तशृंगगडावरील यात्रेसाठी खान्देशातील भाविक रवाना होण्यास सुरूवात झाली आहे. देवीचे माहेर खान्देश असल्याचे सांगण्यात येते. धुळे, शिरपूर, नंदुरबार, चोपडा, जळगाव या भागातील भाविक या यात्रेत कुणी नवस फेडण्यासाठी तर कुणी श्रद्धास्थान म्हणून सहभागी होतात. यात आपल्या लहानग्या मुलांबरोबर, वयस्कर तरुण मुले- मुली व सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी होत एकात्मतेचा संदेश देतात. धुळे जिल्ह्यातून आलेल्या भाविकांचा झोडगेपासून या यात्रेकरूंचा जिल्ह्यात प्रवेश होतो. झोडगे येथील ग्रामस्थांमार्फत तुळजाभवानी मंदिराजवळ भाविकांसाठी थंड पाणी, अल्पोपाहार तसेच भोजनाची सोय व विश्रांतीची सोय करून देण्यात आली आहे. यासाठी संदीप देसले, शत्रुघ्न देसले, रियाज बागवान, शरद देसले व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. चिखल ओहोळ बंगला येथे चोपडा येथील घनश्याम अग्रवाल मित्रपरिवाराकडून नऊ वर्षांपासून सुरू केलेली परंपरा यावर्षीदेखील सुरू आहे. याठिकाणी भक्तांसाठी ऐसपैस मंडप उभारण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टर उपलब्ध असून, पॅरासिटॅमॉल, आयब्रुफेन क्रोसिन, जखमी मलम, ओआरएस औषध वाटप केले जात आहेत. महामार्गावरील भरडाईमाता मंदिर, जाखोटिया परिवाराच्या वतीनेही विविध सुविधा यात्रेकरुंना पुरविण्यात येत आहेत. याबरोबर खासगी विक्रेते यांच्याकडून शीतपेये, अननस, द्राक्षे, काकडी, स्ट्रॉबेरी टरबूज, शहाळे यासारखी तहान भागवणारी फळे, टोपी, रूमाल, उपरणे, गॉगल्स अशा वस्तूंची मागणी वाढली आहे.
गडावर जाणाऱ्या भाविकांमुळे फुलला भक्तिमळा
By admin | Published: April 07, 2017 11:52 PM