नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने भलेही बस आगारांचे विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट करण्याची तयारी केली आणि महत्त्वाच्या मार्गांवर सध्या बसऐवजी शिवशाही या अद्ययावत बस सुरू केल्या असतील पण मूळ कारभार सुधारत नसल्याचा अनुभव सोमवारी (दि. ५) पुणे-नाशिक असा प्रवास करणाºया प्रवाशांना आला. चालक नवखा, त्यात बसमध्ये एसी सुरू करण्याचे ज्ञान नाही आणि नाशिकचा ठरवून दिलेला मार्गही माहीत नसल्याने अखेरीस प्रवाशांची मदत आणि मार्गदर्शनाखाली हा संथ प्रवास पार पडला. पुण्याहून सकाळी साडेसात वाजता निघालेली बस नाशिकला साधारण पाच तासांत पोहोचते, परंतु ती दुपारी दोन म्हणजे सात तासांनी नाशिकला पोहोचली. सोमवारी (दि.५) सकाळी साडेसात वाजता पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकातून शिवशाही बससाठी आरक्षण करताना काही सीट अस्वच्छ असल्याने ते प्रवाशांना देऊ नका, असे चालक सांगत असताना ते प्रवाशांना देण्यात आले त्यामुळे बसमधील अवस्था बघून वाहकाशी काहींचे वादही झाले. त्यानंतर बस सुरू झाली परंतु शिवाजीनगरातून बाहेर पडताच चालक मार्ग चुकला आणि उड्डाणपुलावर बस नेण्याऐवजी पुलाखालून नेली. मार्ग चुकल्याचे लक्षात आल्यानंतर बस पुन्हा माघारी नेण्यात आली, पण चालकाने आपण नवीन असून, नाशिक मार्गाविषयी पुरेशी माहिती नसली असल्याचे सांगितल्याने प्रवाशांना धक्काच बसला. नाशिक फाटा आणि भोसरीसह अनेक ठिकाणचे थांबे आणि अन्य माहितीही चालकाला नसल्याने प्रवाशांनीच मार्गदर्शन केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान उकाडा जाणवत असताना बसमधील एसी चालू नव्हता त्यामुळे तो सुरू करण्याची प्रवाशांनी सूचना करताना या बसमधील एसी कसा चालू करायचा हेच माहिती नसल्याची कबुली नवख्या चालकाने सांगितल्यानंतर प्रवाशांच्या संतापात भर पडली. अखेरीस एका प्रवाशाने खटपट करीत एसी चालू केला अन् पुन्हा प्रवास सुरू झाला पण बस पिकअप घेत नसल्याचे चालकाने सांगितले आणि शेवटी सारेच नशिबाला दोष देत तर काही परिवहन महामंडळावर टीका करीत बसून राहिले.
चालकामुळे शिवशाही बसचा रेंगाळला प्रवास महामंडळाचा कारभार : पुण्याहून नाशिकला पोहोचायला लागले सात तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:51 AM
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने भलेही बस आगारांचे विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट करण्याची तयारी केली आणि महत्त्वाच्या मार्गांवर सध्या बसऐवजी शिवशाही या अद्ययावत बस सुरू केल्या.
ठळक मुद्देप्रवाशांची मदत आणि मार्गदर्शनाखाली हा संथ प्रवास पार उड्डाणपुलावर बस नेण्याऐवजी पुलाखालून नेली