ओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणारी ठरली आहे.नाशिक येथून द्राक्षांची सर्वात जास्त निर्यात युरोप खंडात होते. परंतु जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यात छाटणी झालेल्या बागांना परतीच्या पावसाने दिलेल्या फटक्यामुळे बाजारातील आवक घटणार असल्याचा अंदाज व्यक्त होत होता. यंदादेखील वातावरण पोषक दिसत होते. परंतु आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून पडलेल्या जोरदार पावसाच्या जवळपास प्रारंभीच्या बागा बळी पडल्या. थोड्या दिवसानंतर डावणीचादेखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता.यासर्व घटनांमधून शेतकºयानेहार मानली नाही. त्यात आॅक्टोबरचे पहिले चार दिवस सोडले तर त्यानंतर निसर्गाने-देखील चांगली साथदिल्याने राहिलेला माल चांगल्याप्रकारे तयार होण्यास मदत झाली.परंतु झालेले नुकसान हे वीस ते तीस टक्के राहिल्याने त्याचा थेट परिणाम शेवटी दिसून आला. तूर्तास बागायत पट्ट्यांमध्ये रूई, धारणगाव निफाडचा काही भाग, खेडगाव, अंतरवेली, साकोरे मिग व इतर काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध आहे.राज्याच्या विविध भागातून १०७ टन निर्यातनाशकातून ऐंशी टक्के द्राक्षांच्या विविध जातींची निर्यात होते. परंतु राज्यात सांगली, सातारा, लातूर, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, बीडसह कर्नाटकमधूनदेखील १०७ मे.टन द्राक्ष निर्यात झाली आहे तर भावातील चढउतार बघता यंदा मधल्या काळात सरासरी भाव मिळण्यास कसरत करावी लागली असली तरी शेवटी दर काही अंशी समाधानकारक राहिल्याने खर्चाचे ताळमेळ काही अंशी बसल्यास मदत झाली.यंदा एकूण १,०२,८१४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून, मागील वर्षी हाच आकडा १,३१,९८० टन इतका होता. त्यात युरोपीय देशात ८०,८१९ मे.टन (मागील वर्षी ९०९९३ मे.टन तर पूर्ण देशातून हा आकडा १०१७१६ मे. टन होता). युरोपीय देशांव्यतिरितक्त यंदा २२१९५ मेट.टन माल निर्यात झाला. (मागील वर्षी हा आकडा ४०९८७ मेट्रिक टन होता)
द्राक्ष निर्यातीत यंदा तीस हजार टनांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:14 AM
ओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणारी ठरली आहे.
ठळक मुद्देओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणारी ठरल