मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.अजून एक महिनाभर पुरेल एवढाच चारा उपलब्ध असून, पुढचे ५ ते ७ महिने काढायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांचे मनेगाव येथील पाहुणे तानाजी शिंदे यांना ट्रॅक्टरद्वारे १ ट्रॉली मक्याच्या चाºयाची कुट्टी नेण्यासाठी सुमारे ७० किलोमीटर अंतर जाण्यासाठी तयारी करीत आहेत. या १ ट्रॉली चाºयाची सध्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. गत महिन्यात मोठ्या प्रमाणात चाºयाची विक्र ी चढ्या दराने करण्यात आली होती.दुसºया जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शेतकºयांनी येवला तालुक्यातील पश्चिम भागातून चारा वाहतूक केली आहे. आता नवीन चारा करायचा म्हटल्यावर पाण्याचा प्रश्न पुन्हा शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. कारण मे महिन्यापासून केवळ कडक उन्हाची तीव्रता सोसत असलेल्या मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, मुखेड, मुखेड फाटा आदी भागात विहीर, बोअरवेल यांनी केव्हाच तळ गाठला असल्याने नवीन चाºयाच्या पिकाला पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येवला तालुक्यातील ५ मंडळात शासनाने दुष्काळी परिस्थिती असल्याची घोषणा १ महिनाभरापूर्वीच केली असून, अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा दुष्काळी उपाययोजना केल्या नाही. शासनाने केवळ दुष्काळाची घोषणा न करता दुष्काळ निवारण करण्याची तसेच मागणी शेतकºयांकडून होत आहे.दुष्काळग्रस्त भागात शासनाने प्रामुख्याने जनावरांच्या चारा छावण्या तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. चारा छावण्या तत्काळ सुरू न केल्यास महागडी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.- बाळासाहेब वावधाने, शेतकरी
दुष्काळी परिस्थितीमुळे मिळेना जनावरांना चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:09 AM
मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फिटल्याने जनावरांना चारा उपलब्ध कसा करावा, अशी दाहकता बऱ्याच शेतकºयांना लागली आहे.
ठळक मुद्देजनावरे स्वस्तात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.