राजापूर : तालुक्यातील पूवेंकडील भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व मजूर हवालिदल झाले असल्याने पूवेंकडील भागात दूष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत जनावरांना चारयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यावषीॅ कमी पडलेल्या पावसाने सवॅञ पाणी टंचाई व चारा टंचाईचे सावट निर्माण झाले आहे शेतकर्यानी खचॅ केलेला वसूल न झाल्याने शेतकरी कजॉच्या संकटात सापडले आहे खिरपाची पेरणी ही संपूर्ण वाया गेली व अपूर्या पावसामुळे पिंकाची वाढच झाली नसल्याने अपूर्या वाढलेला बाजरी ,मका चारा हा बाटूक किती दिवस पूरणार असा प्रश्न पशूपालकांसमोर उभा राहीला आहे आता पासून जनावरांना वाळलेले अवस्थेत असलेले गवत,चारा खावा लागत आहे त्यामुळे पूवेंकडील भागात काही शेतकर्याकडे दूधाळ गायी म्हशीला हिरवा चारा देणे अवघड झाले आहे अनेक शेतकर्याकडे दोन बैल गायी आहे परंतु वरूण राजाने सगळ्यांना एकाच पारड्यात बसविले असल्याने निसर्गाच्या लहरीपणामूळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दूष्काळी कामे लवकर सूरू करावी, जनावरांना चारा व पाणी ची व्यवस्था करावी अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी, लक्ष्मण घूगे, सागर अलगट ,गोकुळ वाघ,सूभाष अलगट आदींनी केली आहे.
राजापूर येथे दुष्काळी कामे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी, मजूर हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 5:42 PM