राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे. बळीराजाला आत्तापासून चारा व पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विहीरी कोरडया ठाक पडल्या आहे राजापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरून पाणी आणून आपल्या जनावरांना पाणी द्यावे लागत आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना हा प्रत्येकाला करावा लागत आहे. ग्रामिण भागातील मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर येथे दुष्काळाचे कामे व पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा या संकटाचा सामना शेतकरी व मजूरावर आली आहे. राजापूर येथे निसर्गावरच येथील शेती अवलंबून आहे. राजापूर येथील जनतेच्या नशिबी दूष्काळाची झळा सोसावी लागत आहे. मका चारा बाहेर गावातून आणण्यासाठी भाड्याने टॅक्टर चार ते पाच हजार व त्यासाठी मजूर व चारा रचण्यासाठी येणारा खर्च व चारा घरापर्यंत नेता ना अनेक अडथळे सहन करावा लागत आहे. शहरातून प्रवेश करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राजापूर येथे टॅकर सूरू करावी व टॅकरच्या खेपा मध्ये वाढ करावी अशी मागणी शंकरराव अलगट समाधान चव्हाण ,गोकुळ वाघ, बबन अलगट, भाऊसाहेब बैरागी लक्ष्मण घूगे,शंकर मगर,आदींसह शेतकर्यानी केली आहे.
राजापूर सह तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात दुष्काळ सदृश परिस्थिती....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 5:42 PM
राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर जातात. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना देखील घडल्या आहे. त्यामुळे चार्याचा स्पर्श विजेच्या तारांना होऊ नये यासाठी ट्रॅक्टरच्या चालकाला धाकधूक करीत, शहरातून प्रवेश करावा लागत आहे. तसेच चारा आणण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर मिळणेही अवघड झाले आहे.
ठळक मुद्देविजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरवरील चारा पेटल्याची घटना