शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

येवल्यात दुष्काळाची धग वाढली ; पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:59 AM

प्यायला पाणी नाही, कुठून आणायचे? लाइट गेली, रॉकेल संपले... आता दिवा कशाचा लावू? जनावरांना प्यायला पाणी नाही, चाराही शिल्लक नाही, आणायचा कुठून?

पाटोदा : प्यायला पाणी नाही, कुठून आणायचे? लाइट गेली, रॉकेल संपले... आता दिवा कशाचा लावू? जनावरांना प्यायला पाणी नाही, चाराही शिल्लक नाही, आणायचा कुठून? आज बाजाराचा दिवस आहे हो, आठवड्याचा बाजार आणायचा आहे? कामच नाही तर बाजाराला पैसा आणायचा कुठून, असे अनेक सवाल ग्रामीण महिला कुटुंबप्रमुखाला विचारू लागल्या आहेत. समोर अनेक समस्या आ वासून उभ्या असल्याने कोणत्या समस्येला अग्रक्र म द्यावा, या संभ्रमात कुटुंबाचा कर्ता सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात दुष्काळाची धग वाढली आहे. दुष्काळी यादीत समावेश असूनही तालुक्याला कोणत्याच सोयीसवलती मिळालेल्या नाहीत. दुष्काळी कामे सुरू नसल्याने हातावर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर अनेक कुटुंबांनी रोजगार मिळविण्यासाठी शहराकडे धाव घेतली आहे. तेथे मिळेल ते काम करून आपली भूक भागवावी लागत आहे. इतकी भयानक परिस्थिती यंदा तालुक्यात निर्माण झाली आहे.तालुक्यातील दोन लाख नागरिकांना टॅँकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. जवळपास १०६ गावे वाड्या-वस्त्यांना ५१ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सरासरी दिवसाकाठी १११ टॅँकरच्या खेपा केल्या जात आहेत. जसजशी उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे तसतशी टँकरने पाणी मागणाºया गावांची संख्या वाढू लागली आहे. यात मानोरी बु।।, नागडे, रायते, चिचोंडी खु. चिचोंडी बु।। आदी गावांचा नव्याने टॅँकर प्रस्ताव पंचायत समितीला दाखल झाला आहे.या गावांना टँकरने पाणीपुरवठाखैरगव्हाण, कुसमाडी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, वाईबोथी, खिर्डीसाठे, गुजरखेडे, अनकाई, सोमठाणजोश, पांजरवाडी, राजापूर, शिवाजीनगर, वाघाळे, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, वसंतनगर, नीलखेडे, नगरसूल, गारखेडे, गोरखनगर, डोंगरगाव, पन्हाळसाठे, धामणगाव, आहेरवाडी, लहित, आडसुरेगाव, सायगाव, कोळम बु।।, कोळम खु., कासार्खेडे, चांदगाव, नायगव्हाण, देवदरी खरवंडी, ममदापूर, तळवडे, खामगाव, देवळणे, देवठाण, बदापूर, मातुलठाण, आडगाव रेपाळ, कोटमगाव खु. कोटमगाव बु।।, तांदूळवाडी, गणेशपूर, सावखेडे, पुरणगाव व इतर वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी