शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

अपुºया बसेसमुळे तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:40 AM

देसराणे : तालुक्यातील रवळजी, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी ९ ते ९.३० वाजता कळवण आगाराने नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले.

देसराणे : तालुक्यातील रवळजी, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी ९ ते ९.३० वाजता कळवण आगाराने नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कळवणहून सकाळी आठ वाजता बस थेट जयदरपर्यंत जाते; मात्र जयदरपासून खेड्यांमधून प्रवासी, शालेय विद्यार्थी यांनी ही बस भरून येते. परिणामी नाळीद, इन्शी, देसराणे, रवळजी या गावांना ही बस थांबत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, प्रवाशांना याची झळ बसत असते. शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत कळवणला पोहोचता येत नाही. अनेकवेळा तक्रारी करूनदेखील कळवण आगारप्रमुख याकडे दुर्लक्ष करीत आहे. कळवण, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी आठ वाजता बस असून, त्यानंतर थेट अकरा वाजताच बस उपलब्ध आहे.त्यामुळे प्रवासी नागरिकांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. संतप्त प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अनेक वेळा देसराणे येथे आंदोलन केले होते. आगाराने कळवण ते देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी नऊ वाजता नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिकांनी केली आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, विधानसभा संघटक दशरथ बच्छाव, विधानसभा सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, कक्ष शहरप्रमुख किशोर पवार, युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, विधानसभा संघटक संभाजी पवार व विद्यार्थी उपस्थित होते.