घोटी : जिल्हा परिषद नाशिकच्या सर्व संवर्गिय कर्मचारी संघटना, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणकि संप सुरू केला. यामुळे कार्यालयीन कामकाज दिवसभर ठप्प झाले. आंदोलनाच्या या दुसर्या टप्प्यात इगतपुरीच्या पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाºयांनी सहभाग घेतला. २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतन त्रुटी दूर करावी, अनुकंपा भरतीचे प्रमाण वाढवून रिक्त जागा तात्काळ भराव्या, महिलांची बालसंगोपन रजा वाढवावी, सातव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांना वेतन भत्यात वाढ करून मिळावी, कंत्राटी कर्मचाºयांना कायम करावे आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले. गटविकास अधिकारी किरण जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका प्रतिनिधी संदीप दराडे, सचिव जयश्री भोये, सहसचिव अनिल बच्छाव, भगवान पवार, राजेंद्र मोरे, संध्या गांगुर्डे, रमेश शिंदे, सुशीला पुराणे, निलांबरी हिरे, नामदेव गोडे, सविता पाटील, अजित गुंफेकर, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इगतपुरी पंचायत समितीचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:44 PM