शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

देवपूर परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:11 AM

एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्ग-प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.

देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्ग-प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे. निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीस पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सीताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करीत असत. निसर्गाच्या या सान्निध्यात राष्टÑीय पक्षी मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील नागरिकांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जून देवपुरात यायची व हरखून जायची. तथापि, आता मात्र येथील चित्र बदलले आहे. एरवी उन्हाळ्यातही तुडुंब असणारे देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडते आहे. पाणी कमी झाल्याने बागाही कमी झाल्या असून, वृक्षतोडीमुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खूपच कमी प्रमाणात दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळक प्रमाणात दिसून येतात. त्यांच्या आश्रयाने फिरणारे मोरही आढळून येतात. तथापि, त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे पाहावयास मिळते. नदीला पाणी नाही व फळबागातून पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे मोरांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. नदीच्या कडेला त्यांच्या पाण्यासाठी ओहोळ बांधण्याची गरज आहे. तथापि, तसे होत नसल्याने मोरांचे गाव असलेल्या देवपुरातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली आहे. वनखात्याकडून या राष्टय पक्षाच्या रक्षणासाठी काहीही उपाय-योजना केल्या जात नसल्याने येथील मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य