नाशिक : औद्योगिक क्षेत्रात उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले.नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत गेल्या 40 वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाची वीज उरकरणे बनविणाऱ्या एबीबी कंपनीने नाशिकमधील वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार केला असून शुक्रवारी(दि. 19) कंपनीच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एबीबीने 5 एकर क्षेत्रावर उभारलेल्या नवीन कारखान्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीव शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळ एबीबी समुहाचे इलेक्ट्रीफिकेशन प्रोडक्ट व्यवस्थापक मार्को टेलरीनी, मेटेओ केटी, एबीबी इलेक्ट्रीफिकेशन प्रोडक्ट इंडियाचे अध्यक्ष सी. पी.व्यास आदि उपस्थित होते. या नवीन कारखान्यामुळे ह्यमेक इन नशिकह्णच्या अभियानाला बळ मिळाले असून गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गुंतवणूक येत नसल्याने औद्योगिक क्षेत्रला आलेली मरगळ दूर होण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी शर्मा यांनी नाशिकमध्ये कुलश मन्यष्यबळ असल्यानेच कंपनीने येथे संशोधन व विकास केंद्रही सुरू केल्याचे सांगत त्यामुळेच नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन होत आहे. एबीबीच्या एकूण उत्पादनापैकी नाशिक मधून सर्वाधिक 10 ते 12 टक्के निर्यातक्षम उपकरणांची निर्मिती होते. नव्या कारखान्यामुळे हे प्रमाण काही वर्षातच 20 ते 22 टक्के होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर कंपनीने आतार्पयत बहूतांश स्थानिक मनुष्यबळास रोजगार देण्याचे धोरण राबवले असून कंपनीच्या विस्तारामुळे स्थानिक नागरिकांना आणखी रोजगार उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे नाशिक युनीटचे प्रमुख गणोश कोठावदे यांनी दिली. परंतु कारखान्याचे उत्पादन मागणीनुसार वाढणार असल्याने मनुष्यबळातही टप्प्याटप्पयाने वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या केद्रीय विद्युत संशोधन संस्थेचे (सीपीआरआय) केंद्र सुरु झाल्यास विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल असा विश्वासही कोठावदे यांनी व्यक्त केला.
वीज उपकरणनिर्मिती उद्योग विस्तारामुळे मेक इन नाशिकला बळ, एबीबीच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 5:01 PM
उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देउद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळाचे उपलब्ध उद्योग विस्तारामुळे मेक इन नाशिकला मिळणार बळ