पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी झाडाचे संवर्धन करणे,अंगणात दाना पाण्याची व्यवस्था करणे आदी प्रयत्न करणे गरजेचे आहे.कारण या कमाल तापमानाच्या तडाख्यात पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे असा काही प्रकार पिंपळगाव बसवंत येथील परिसरात घडला येथे भर उन्हाच्या उष्मघातात एक कबूतर कासावीस होत झाडावरून खाली पडले हे येथील बाळा कराटे या युवकाने त्या कबुतराला उचलून सावलीत आणले पाणी पाजले,त्याला गार पाण्यात अंघोळ घालून त्याच्यावर प्राथमिक उपचार केला आण िदोन तीन दिवस त्याला दाना पाणी करून रानात सोडून देणार असल्याचे बाळू कराटे यांनी सांगितले तसेच या युवकाने अंगणात पशुपक्षासाठी दाणा पाण्याची सोय केलेली आहे इतरांनी हा आदर्श घेऊन पशुपक्षीसंवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे .उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे सर्वच ठिकाणी त्राहीत्राही होऊन जनजीवन त्रस्त झाले आहे. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र, वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न साहजिकच मनात येतो. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता पिंपळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणासाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो.पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वार्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते मृत्यूमुखी पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभाग व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेने गरजेचे आहेहिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे.अशी घ्या काळजी......घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आण िबाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.अंगणात झाडाच्या सावलीखाली मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे.
अति उष्माघातामुळे पशू-पक्ष्यांचे जीवन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 9:22 PM
पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी झाडाचे संवर्धन करणे,अंगणात दाना पाण्याची व्यवस्था करणे आदी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : उन्हात पडलेल्या कबुतराला युवकाने दिले जीवनदान