नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी बीएलओंची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, निवडणुकीच्या कामाकडे ‘नॉन प्रॉडक्टिव्ह वर्क’ म्हणून पाहण्याच्या महसूल अधिकाºयांच्या मानसिकतेचा फायदा घेत मालेगावच्या निवडणूक कर्मचाºयाने चक्क आपल्या मित्र, मैत्रिणींना व पत्नीला बीएलओ (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) म्हणून कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे दरवर्षी बॅँकेत जमा होणाºया रकमेचा अपहार केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून हा सारा प्रकार सुरू असताना तहसीलदार वा निवडणूक नायब तहसीलदारांनी त्याकडे सोयीस्कर भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे.मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणुका व मानधन वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्ह्णातील सर्वच विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या सर्व बीएलओंची खात्री करण्यासाठी लवकरच त्या त्या मतदारसंघात बैठक घेण्याचा विचार सुरू झाला आहे. विशेष करून मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन मतदारसंघाबरोबरच नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघातील बीएलओंच्या नेमणुकीबाबत प्रशासन साशंक आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे निवडणूक आयोगाकडून मिळणाºया मानधनाची लाखो रुपयांची रक्कम खर्ची दाखविली जात असून, प्रत्यक्षात बीएलओंचे कामकाज मात्र दिसून येत नाही. त्यामुळे काम न करता बीएलओंना मानधनाची रक्कम कशाच्या आधारे अदा केली जाते, असा प्रश्नही उपस्थित केला जात असून, एकतर बीएलओंची नेमणूक न करताच त्यांच्यानावे रक्कम काढली जात असावी किंवा काम न करताच बीएलओंना मानधन अदा केले जात असावे, या दोहोंपैकी एक काही तरी खरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालेगाव येथील निवडणूक कर्मचारी सोनवणे याने तर बीएलओंच्या मानधनाची रक्कम आपली पत्नी, मैत्रीण, मित्र व त्याच्या मैत्रिणीच्या नावे बॅँकेत जमा करून हजारो रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. याचाच अर्थ बीएलओंची नेमणूक न करताच कागदोपत्री तसे दाखविण्यात आले आहे. सदरची बाब उघडकीस येऊन बराच महिन्यांचा कालावधी लोटला; परंतु त्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यास अधिकाºयांकडून प्रारंभी टाळाटाळ करण्यात आली त्यानंतर मात्र स्वत:वर बालंट येण्याची शक्यता पाहून तक्रार देण्यात आली आहे.
कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले मित्र-मैत्रिणींनाही लाभ : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:29 AM
नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी बीएलओंची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, निवडणुकीच्या कामाकडे ‘नॉन प्रॉडक्टिव्ह वर्क’ म्हणून पाहण्याच्या महसूल अधिकाºयांच्या मानसिकतेचा फायदा घेत मालेगावच्या निवडणूक कर्मचाºयाने चक्क आपल्या मित्र, मैत्रिणींना व पत्नीला बीएलओ (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) म्हणून कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे दरवर्षी बॅँकेत जमा होणाºया रकमेचा अपहार केला आहे.
ठळक मुद्देतहसीलदारांनी त्याकडे सोयीस्कर भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहेमानधन वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा