शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 5:24 PM

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्दे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान या तालुक्यात नोंदविले जाते. या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा स्त्रोत अडवून या तालुक्यात सात मोठी धरणे बांधली आहेत, ज्याद्वारे मुंबई, मराठवाडा, नगर,अशा अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने शासनाने अगोदरच या तालुक्यास दुष्काळ ग्रस्त तालुका यादीत समाविष्ट केले आहे. त्यात धरणे क्षमतेपेक्षा कमी भरल्याने आणि पाटबंधारे विभागाने भरमसाठ पाणी जायकवाडी आणि वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडल्याने डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये खडखडाट झाला आहे. त्यामुळे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार आहे.तालुक्यात मुकणे, दारणा, वाकी खापरी, भाम, भावली, कडवा, वैतरणा अशी सात मोठी धरणे आहेत. वैतरणा धरणाचे पाणी मुंबईसाठी व जलविद्युत प्रकल्पसाठी वापरले जाते तर इतर धरणांचे पाणी मराठवाडा व इतर ठिकाणी जाते. तर छोट्या लघुबंधारे, पाझर तलाव यांचे पाणी परिसरातील गावासाठी वापरले जाते. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना, जलसिंचन योजना या धरणांवर अवलंबून आहेत.पाऊस कमी झाल्याने जामिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक विहिरिंनी तळ गाठले आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकाºयांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरविली आहे. आणि खरीपाबरोबरच रब्बी हंगाम ही धोक्यात आला आहे. पिकांना भाव नाही, कर्ज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.त्यात जलसाठे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुष्काळ निवारणासाठी आतापासुन नियोजन करणे गरजेचे आहे. आढावा बैठक घेवून यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची आवर्तने देतांना काटेकोर नियोजन महत्वाचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.मुकणे व दारणा धरणातून गेल्या महीन्याभर पाणी सुरु होते. मात्र यावर कुणीही आवाज उठवला नाही. प्रसिद्धि माध्यमातून यावर आवाज उठवल्यानंतर पाणी बंद करण्यात आले होते. ही आवर्तने दिल्याने मुकणे व दारणा ही धरणे लवकरच तळ गाठतील असे चित्र आहे. यावर अवलबुन असलेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.-------------------------------------------------------------धरण              १६ डिसेंबर २०१७ चा साठा      १६ डिसेंबर २०१८ चा साठा                                                                        दारणा                  ९२.९६ %                               २९.३३ %मुकणे                 ८२.२९ %                                ४१.४७ %कडवा                  ८३.३५ %                               ५०.७३ %भावली                ९८.०७ %                                ३५.१० %वाकी खापरी        ७५.६३ %                               ५८.२४ %-------------------------------------------------------------