नाशिक : मुंबईत मंगळवारच्या पावसात अडकून पडलेले शेकडो नाशिककर बुधवारी पहाटे सुखरूप नाशकात परतले असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कालच्या पावसानंतर सुरळीत झाली असली तरी, हवामान खात्याच्या इशाºयामुळे मुंबईकडे जाणारी वाहनांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, कसारा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहने थांबविण्यात आली. त्यानंतर मात्र पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होऊन मुंबई ठप्प झाली. रेल्वे व रस्ता वाहतूक बंद केल्यामुळे अनेकांना मुंबईतच रात्री अडकून पडावे लागले. साधारणत: आठ ते दहा तास वाहतुकीत अडकून पडलेल्या नाशिककरांना रात्री बारा वाजेनंतर मुंबईतून बाहेर पडण्याची संधी मिळाली. त्यामुळे रात्रभर मुंबईकडे जाणाºयांपेक्षा परत येणाºया वाहनांची महामार्गावर रीघ लागली. पहाटे नंतर संपूर्ण मुंबईतील वाहतूक सुरळीत झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. परंतु याचवेळी मुंबई व परिसरात दिवसभर अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे वाहनचालकांनी बुधवारी मुंबईला जाण्यास नकार दिला. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करण्यात कोणतीही अडचण नसून थेट मुंबईपर्यंत वाहने ये-जा करू शकतात; मात्र मुंबईला जाणाºया व येणाºया दैनंदिन वाहनांपेक्षा बुधवारी रस्त्यावर तुरळक वाहने धावली. मुंबईला जाण्यासाठी द्वारका येथे खासगी वाहनांची वाट बघणाºया प्रवाशांना वेळेवर वाहने मिळत नव्हती.खासगी वाहनचालकांचा नकारमंगळवारी मुंबईच्या पावसात व पुरात अडकून पडलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी परतल्यानंतर त्यांनी कथन केलेला अनुभव पाहून बुधवारी वाहनचालकांनी मुंबईच्या प्रवासी वाहतुकीला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नाशिकमधून दररोज मुंबईला प्रवासी घेऊन जाणारी शेकडो खासगी वाहने रस्त्यावर उतरली नाहीत.जुन्या कसारा घाटात दरड कोसळलीसकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान जुन्या कसारा घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ वाहने थांबविण्यात आली. के्रनच्या साहाय्याने दरड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने दिली.
पावसाच्या भीतीने मुंबईकडे तुरळक वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:09 AM