संगमेश्वर : येत्या १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने मालेगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली आहे. परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा काहीसा परिणाम मात्र गणेशोत्सवावर दिसून येत आहे.शहरातील विविध मंडळांनी व संस्थांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. त्याद्वारे नूतन पदाधिकारी निवडणे, दहा दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी, गणेश मूर्तीची निवड व सर्वात महत्त्वाचे यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची आखणी करण्यात कार्यकर्ते सध्या व्यस्त झाले आहेत. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, मिरवणूक व वाजंत्री यांचे नियोजन करण्यात येत आहे. मालेगावसह कसमादे परिसरात यंदा वरुणराजा रुसल्याने शेतकरीवर्गासह व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी वरुणराजा हवा तसा बरसलाच नाही. आर्थिक मंदीचे वातावरण असल्याने त्याचा काहीसा परिणाम गणेशोत्सवावर जाणवत आहे. पावसाअभावी कार्यकर्त्यांमध्येही उत्साह जाणवत नाही. पावसाने कृपा केल्यास गणेशोत्सवात कामाला वेग येईल असा अंदाज आहे.कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू पदाधिकारी निवडणे, कार्यक्रमाची आखणी, मूर्तीची निवड व आर्थिक तरतुदीची आखणी कार्यकर्ते करीत आहेत. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, मिरवणूक व वाजंत्री यांचे नियोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:02 AM
संगमेश्वर : येत्या १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने मालेगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली आहे. परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा काहीसा परिणाम मात्र गणेशोत्सवावर दिसून येत आहे.
ठळक मुद्देमालेगाव : गणेश मंडळांची लगबग सुरू