पंचवटी: गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला हिरावाडीतील (तांबोळीनगर) अठरा वर्षीय युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे़ अनमोल आनंद दोरकर असे या युवकाचे नाव असून, त्याला शोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलामार्फत बुधवारी (दि़ १८) दिवसभर सुरू होते़पंचवटी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मंगळवारी (दि़ १७) दुपारी चार वाजेच्या सुमारास दोरकर हा आपल्या तीन-चार मित्रांसमवेत पंचवटी स्मशानभूमीजवळ असलेल्या टाळकुटेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. सलग सुरू असलेल्या पावसामुळे सोमवारी गोदावरीला पूर आला होता, तर मंगळवारच्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने नदीपात्रात पुराचे पाणी कायम होते़दोरकर व त्याच्या मित्रांनी टाळकुटेश्वर पुलावरून वाहत्या पाण्यात उड्या घेतल्या त्यानंतर त्याचे तिघे मित्र पोहत पाण्याबाहेर आले. मात्र, दोरकर हा पुराच्या पाण्यातील प्रवाहाबरोबर वाहत गेला. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही़ याबाबत त्यांनी पंचवटी पोलिसांना व अग्निशमन दलाला माहिती दिली़यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दोरकरचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही़ तसेच सायंकाळ झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. दरम्यान बुधवारी (दि. १८) पुन्हा वाहून गेलेल्या दोरकरला शोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलाच्या विभागामार्फत सुरू होते़ बाजार समितीत कामास असलेला दोरकर हा सकाळी कामावर गेला होता़ दुपारी घरी आल्यानंतर मित्रांसमवेत तो गेला व ही घटना घडली़
गोदावरीच्या पुरात युवक वाहून गेल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:49 AM
पंचवटी: गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला हिरावाडीतील (तांबोळीनगर) अठरा वर्षीय युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे़ अनमोल आनंद दोरकर असे या युवकाचे नाव असून, त्याला शोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलामार्फत बुधवारी (दि़ १८) दिवसभर सुरू होते़
ठळक मुद्देशोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलामार्फत दिवसभर सुरू