लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बी हंगामातील आलेला कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजांने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. यंदा पावसाळा सुरू होताच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लखमापूर, म्हेळुसके, परमोरी, अवनखेड, करजंवण, ओझे, ओझरखेड, दहेगाव वागळुद इ. भागातील शेतकरी वर्ग खरीप हंगामासाठी सज्ज झाला. मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असतांना पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झाला आहे. पेरणी करून जर पाऊस उशीरा पडला तर या काळजीत तालुक्यातील शेतकरी वर्ग पडला आहे.कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटानी अगोदरच ग्रामीण भागातील जनता त्रासुन गेलेली आहे. त्यात मोठ्या कष्टाने खरीप हंगामाची तयारी करून शेतामधुन जास्त कसे उत्पन्न घेता येईल यांचे नियोजन करून बळीराजा शेती कामाला लागला. यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने आता पाण्याची काळजी मिटली. या आशेवर बळीराजांने सोयाबीन, भुईमूग, मका, भात, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी मध्यावर आणली, परंतु आतामात्र काही गावामध्ये खुप गरज असतांना पाऊस लंपडाव खेळत आहे. त्यामुळे आपल्या खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भिती बळीराजाला वाटु लागली आहे.कादवा काठच्या गावांना नदीला पाणी हा थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळे कादवा काठच्या बºयाच गावांनी भाजीपाला पिक घेण्याकडे कल दिला आहे. नगदी पीकाला जर आपण घेतले तर आपल्या हातात उत्पन्नाचे भांडवल खेळते राहिल अशी धारणा धरून बळीराजा तयारीला लागला आहे.
पावसाने दडी मारल्याने पेरणीबाबद बळीराजांची व्दिधा अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 6:48 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
ठळक मुद्देलखमापूर : चिंतागस्त शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे