नाशिक : ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा चांदवड तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचे अधिक नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले असून संबधित अहवाल कृषी विभागाकडे मुल्यमापनासाठी पाठविण्यात आला आहे.कोकण किनाररट्टीवर गेल्या आठवडयात धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही बेमोसमी पाऊस व ढगाव वातावरण तयार झाल्यामुळे जिल्हा परिसरातील पिकांचे मोठे नुकसाने झाले आहे. ओखी वादाळामुळे जिल्ह्यात सुमारे 125.5 मिलिमिटर पाऊस झाल्यामुळे शहरपरिसरासह जिल्हाभरातील काढणीला आलेल्या द्राक्ष मणी तडकल्याने मोठे नुकसाने झाले आहे. गेल्या दोन महिन्यात पिकांना हा तिसरा फटका बसला असून यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात अवकाळीने सुमारे 9 हजार क्षेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसाने झाले होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर करपा, डावनीसह वेगवगेळ्य़ा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. तर आता अनेक द्राक्ष बागा काढणीला आलेल्या असताना ओखी वादळाच्या प्रभावामुळे झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचे मणी तडकल्याने निर्यातक्षम द्राक्षांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.अचानक बदललेल्या वातावणाचा फटका द्राक्षांबरोबरच कांदा, मका टोमॅटो आदि पिकांनाही बसला आहे. सध्या काढणीला असलेला कांदा पावसाने भिजल्याने खराब झाला आहे. शेतीमालाचे घसरते भाव आणि त्यातच अवकाळी पावसाने हाताशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून या अहवालानुसार 1 हजार 36 .22 हेक्टर शेती क्षेत्रचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतक:यांना मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याचे प्राथमिक अहवालावरून समोर आले आहे. दरम्यान, ऑक्टोबरमधील अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला, तरी शेतक:यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याविषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.
ओखी वादळामुळे एक हजार हेक्टर शेतीला फटका, द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 3:55 PM
ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नाशिकसह, दिंडोरी, निफाड, सटाणा चांदवड तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ओखी वादळामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचे अधिक नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.
ठळक मुद्देओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतीला फटका1 हजार 36 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचे मणी तडकलेअचानक बदललेल्या वातावणाचा द्राक्षांबरोबरच कांदा, मका टोमॅटोलाही फटका