पूर्वीही चुलींचाच वापर प्रामुख्याने ग्रामीण भागात असायचा. मात्र, घरातील निघणारा धूर कमी व्हावा व महिलांना फुप्फुसाचा त्रास होऊ नये, तसेच जंगल तोड कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत घराघरांत गॅस पोहोचले आहेत. मात्र, आता सिलिंडरचे दर एकदमच वाढल्यामुळे अनेक घरांमध्ये गॅसचे सिलिंडर आता रिकामेच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाकडून फक्त १०० रुपयांत गॅस कनेक्शन मिळाल्याने काही दिवस आनंद मिळाला. आता मात्र गॅसचे सिलिंडर भरण्यासाठी ९०० रुपये लागत असल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेकांसाठी ही रक्कम मोठीच आहे. त्यामुळे सिलिंडर शोपीस ठरले असून, गॅसचा आनंद काही दिवसांसाठीचाच ठरला.
ग्रामीण भागात कोविड-१९ची परिस्थिती व पावसाने दांडी मारल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. काम नाही, धंदा नाही. जेमतेम मजुरी मिळत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा तरी करावा लागत आहे. सिलिंडर भरण्यासाठी पैसा जमा करण्याचे अनेक सामान्य नागरिकांसमोर जणू आव्हानच आहे. ८६० रुपयाचा सिलिंडर व ३० रुपये भाडे असे ८९० रुपयांत भरलेले सिलिंडर मिळत असल्यामुळे महिला पुन्हा चुली पेटवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
कोट...
शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत १०० रुपयांत गॅस कनेक्शन मिळाले. काही दिवसांत गॅसच्या वापर करण्याची सवय पडली. दोन महिने एक सिलिंडरचा वापर होत होता. सबसिडी मिळत असल्यामुळे सिलिंडर भरणे परवडत होते. मात्र, शासनाने सिलिंडरवरील सबसिडी जवळपास बंदच केल्याने आता महागडे सिलिंडर परवडत नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.
- अलका कडाळे, शेतमजूर महिला
फोटो - १२ चांदोरी १
चुलीवर स्वयंपाक करताना महिला.
120721\12nsk_13_12072021_13.jpg
चुलीवर स्वयंपाक करताना महिला.