न्यायडोंगरी : संपूर्ण नांदगाव तालुक्यात या वर्षी एकही दमदार पाऊस झाला नसल्याने पीक पाण्याच्या समस्येबरोबरच जनावरांना चारा मिळेनासा झाल्याने पशुपालक मिळेल त्या भावात आपली जनावरे विक्र ी करू लागली असल्याचे विदारक चित्र न्यायडोंगरी येथे भरलेल्या बैल बाजारावरून दिसून येत आहे. न्यायडोंगरी येथे आतापर्यंत भरलेल्या बाजारात मोठया प्रमाणात बैल विक्र ीसाठी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. विक्र ीसाठी आलेल्या जनावरांचे तुलनेत विकत घेणारांची संख्या अत्यंत कमी असल्याने भाव कमालीचे पडलेले असतांनाही अनेक बैल विक्र ी न झाल्याने पुन्हा माघारी परत घरी घेऊन जाण्याची वेळ अनेक पशुपालकांवर आली. या पुढेही शेवटी शेवटी का होईना एक तरी दमदार पाऊस पडून नदी, नाले , छोटे मोठे धरण ,बंधारे, नाला बांध पाण्याने भरले नाहीत तर येत्या पंधरा दिवसातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध ते साठी टँकर सुरु करावे लागणार आहेत, तेव्हा जनावरांना पाणी कोठून आणणार या धास्तीने पशुपालक मिळेल त्या भावात आपल्या जवळील पशु धन विक्र ी करू लागले आहेत. बाजारातील वस्तुस्थिती जाणून घेतली असता विक्र ी करणाºयांपेक्षा घेणारांची संख्या अत्यन्त कमी दिसून आली. कारण घेणाºयांंपुढेही चारा आणि पाणी याचा प्रश्न येतोच ? कितीही स्वस्त मिळाले म्हणून घेतले तरी त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी आणणार कोठून ? यामुळे इच्छा असूनही व अत्यन्त कमी भावात मिळत असतांनाही घेता येत नाही अशी स्थिती सध्या तरी बाजारात दिसून येत आहे. याच चारा पाण्याच्या भीषण टंचाईकमुळे या वर्षी ऊस तोडणी कामगार यांचे बरोबरच अनेक शेतकरी ही ऊस तोडणी साठी साखर कारखान्या कडे जाण्याची तयारी करू लागल्याने लवकरच नांदगाव तालुक्यातील अनेक गावेच्या गावे ओस पडणार हे मात्र नक्कीच.
चारा नसल्याने बैल विक्रीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 4:23 PM