शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच जामीन : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:25 PM

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ९० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि़१४) संशयित अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना जामीन मंजूर केला़ तपासी यंत्रणांचा हलगर्जीपणा व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच संशयितांना जामीन मिळाला असून, ही तपास यंत्रणेसाठी लांच्छनास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़

ठळक मुद्देदाभोेलकर हत्या प्रकरण : पाच वर्षांनंतरही तपास सुरूच

नाशिक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ९० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि़१४) संशयित अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना जामीन मंजूर केला़ तपासी यंत्रणांचा हलगर्जीपणा व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच संशयितांना जामीन मिळाला असून, ही तपास यंत्रणेसाठी लांच्छनास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़सीबीआय, एसआयटी, एनआयए, सीआयडी, एटीएस या तपासी यंत्रणा डॉ़नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास न्यायालयाच्या आदेशावरून करीत आहेत़ या तपासी यंत्रणांनी योग्य पद्धतीने तपास करण्याऐवजी त्यामध्ये हलगर्जीपणा केला़ तसेच न्यायालयात ९० दिवसांमध्ये या संशयितांवर दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे होते़ मात्र, सीबीआयने वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने त्यांना जामीन मिळाला़ तपासी यंत्रणा या प्रकरणांबाबत संवेदनशीलता व पुढाकाराने तपास करीत नसून यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा पूर्णत: अभाव आहे़ डॉ़ दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या खुनातील गुन्हेगारांना तपासयंत्रणांनी शोधून पुढे आणले असले तरी सरकारने याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही़ याउलट वेळकाढूपणा करून या गुन्हेगारांना पाठीशी घालून न्यायप्रक्रियेवर जबाबदारी ढकलली जाते़लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीच आपली जबाबदारी न्यायव्यवस्थेवर ढकलत असतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे़ डॉ़ दाभोळकर यांच्या हत्येस पाच वर्षांचा कालावधी उलटूनही राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासातील तथ्यांबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य केले नसल्याचे पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी