पिंपळगाव वाखारी : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर मृगाच्या पावसाने पूर्णता पाठ फिरवल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याअसून शेतकरी पावसाची वाट पाहत असून काही ठिकाणी झालेली पेरणी पावसाअभावी धोक्यात आले असून काय ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावत पेरणीपूर्व मशागतीला वेग दिला. परंतु मृग नक्षत्राचा पाऊस येईल या आशेवर शेतकर्यांनी पेरणी थांबवली. आता मृगनक्षत्र संपण्याच्या मार्गावर आले असतानाही पावसाने परिसरात पाठ फिरवली आहे. मृगाची पेरणी खरिपासाठी उत्तम असल्याने शेतकरी मृग नक्षत्राच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. रोहिणी नक्षत्राच्या पावसात काही शेतकऱ्यांनी केलेली खरिपाची पेरणी उन्हाच्या तीव्रतेमुळे धोक्यात आली असून दुबार पेरणीचे संकट काही ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचे संकट आल्यास शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे.
पिंपळगाव वाखारीत पावसाअभावीशेतकऱ्यांची सर्व कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:09 AM
पिंपळगाव वाखारी : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर मृगाच्या पावसाने पूर्णता पाठ फिरवल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याअसून शेतकरी पावसाची वाट पाहत असून काही ठिकाणी झालेली पेरणी पावसाअभावी धोक्यात आले असून काय ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावत पेरणीपूर्व मशागतीला वेग दिला.