राज्य सरकारने येत्या महिनाभर शिवभोजन केंद्रांवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मोफत पोटभर थाळी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला मात्र आधारकार्ड द्यावे लागणार आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून गोरगरिबांसाठी पाच रुपयांत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षापासून ही योजना सुरू असून, आता मात्र पहिल्यांदाच ही थाळी मोफत देण्यात येणार आहे.
-------
शिवभोजन थाळीमुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे. हातमजूर, बेरोजगार व निराधारांना गेल्या वर्षभरापासून शिवभोजन थाळी वरदान ठरली असून, थाळीद्वारे दिले जाणाऱ्या भोजनाचा दर्जाही उत्तम आहे.
- देवीप्रसाद भोजणे
----------
शिवभोजन थाळी फक्त गोरगरिबांसाठीच आहे असे नव्हे तर मध्यमवर्गीयदेखील याचा आस्वाद घेतात. विशेष म्हणजे थाळीचा दर्जा आजवर टिकवून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरत आहे.
- अंबादास गांगुर्डे
-----
संचारबंदी, जमावबंदीमुळे गोरगरिबांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी राज्य सरकारची मोफत थाळी देण्याची योजना स्तुत्य आहे. या थाळीमुळे कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही याची खात्री आहे.
- सोमनाथ दिवे
----------------
जिल्ह्यात शिवभोजन थाळी केंद्र -४६
दररोज किती जण घेतात लाभ- ६०००
---------
सहा हजार जणांना मिळतो लाभ
१) नाशिक जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांमध्ये शिवभोजन थाळी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत.
२) राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या योजनेचे संनियंत्रण केले जाते.