नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मागील गुरुवारी तपमानाचा पारा थेट ९.२ अंशांवर घसरला होता, मात्र रविवारी (दि.२४) पुन्हा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.एकूणच उत्तर भारतात आलेल्या शीतलहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. काश्मीर खो-यात प्रचंड प्रमाणात थंडीची लाट पसरली असून, श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेल्यामुळे उत्तर भारतही थंडीच्या कडाक्याने प्रभावित झाला आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. पारा पुन्हा दहा अंशांच्या खाली गेल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी सकाळी ९.५ इतके तपमान शहरातील पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले. एकूणच रविवारी नाशिकचे किमान तपमान राज्यात सर्वच प्रमुख शहरांपेक्षा कमी असल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद झाली. दहा अंशांच्या खाली शहराचे तपमान येण्याची या पाच दिवसांत दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर महिन्यात नीचांकी १०.२ इतके तपमान नोंदविले गेले होते; मात्र डिसेंबरमध्ये पारा यापेक्षाही अधिक खाली घसरला आहे.वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे शहरात उबदार कपड्यांच्या वापरावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. याबरोबरच शेकट्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. गोदाकाठ, तपोवन, म्हसरूळ, मखमलाबाद, गंगापूरगाव, पाथर्डी, देवळाली कॅम्प यांसारख्या शहराला लागून असलेल्या गावांमध्ये मळ्यांची संख्या अधिक असून, या भागात थंडीची तीव्रता जास्त जाणवत असल्याने संध्याकाळी सहा वाजेपासूनच या भागांमध्ये शेतक-यांकडून शेकोट्या पेटवून गप्पांचे फड रंगविले जात असल्याचे चित्र पुन्हा पहावयास मिळत आहे.
पारा ९.५ अंशांपर्यंत घसरल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमान नाशिकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:41 PM
नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. पारा पुन्हा दहा अंशांच्या खाली गेल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी सकाळी ९.५ इतके तपमान शहरातील पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले
ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यात नीचांकी १०.२ इतके तपमान नोंदविले गेलेरविवारी सकाळी ९.५ इतके तपमान उत्तर भारतात आलेल्या शीतलहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही प्रभाव