गेल्या अनेक दिवसांपासून शहरात लसीकरण सुरू झाले. मात्र, नागरिकांना लसीकरण केंद्रावर रांगा लावूनही लस न मिळाल्याने माघारी फिरावे लागत आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने लसीकरण सुरू असताना पंचवटीत मायको दवाखान्यात नागरिकांना नोंदणी करूनच लसीकरण करावे लागते. त्यातच प्रभागातील स्थानिक नागरिकांना लस घेण्यासाठी प्राधान्य मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या नगरसेवक पाटील व हिरे यांनी मंगळवारी सकाळी मायको दवाखाना येथे लसीकरण केंद्रावर धाव घेत स्थानिक नागरिकांना लसीकरणाला प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करून लसीकरण केंद्राला बाहेरून कडी लावून घेतली होती. लसीकरण केंद्राला कडी लावून लसीकरण बंद केल्याचे समजतात प्रशासनाने तत्काळ जादा डोस उपलब्ध करून दिल्यानंतर काही वेळाने लसीकरण पूर्ववत झाले होते.
लस मिळत नसल्याने केंद्रालाच लावली कडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:14 AM