नाशिक : किरकोळ शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यास परीक्षेपासून दूर ठेवल्याचा प्रकार जेलरोड येथील एमरल्ड पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घडला. याबाबत पालकाने थेट शिक्षणमंत्र्यांकडेच ई-मेलच्या माध्यमातून तक्रार केली आहे. शिशू गटासाठी शाळेकडून वार्षिक १९ हजार रुपये शुल्क आकारले जाते. पालकांनी यातील १६ हजार ४०० रुपये शुल्क शाळेत जमा केले; मात्र २६०० रुपये न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्यास परीक्षेस बसू देण्यास स्पष्टपणे नकार दिला. शुक्रवारपासून शिशू गटासाठी परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार पालक आपल्या पाल्याला शाळेत परीक्षेकरिता घेऊन आले; मात्र शाळेने शुल्क न भरल्याचे कारण सांगत परीक्षेस बसण्यास विरोध केला. तसेच जोपर्यंत उर्वरित शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत परीक्षा देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. यावेळी पालकांनी शाळेकडे शुल्क भरण्यासाठी मुदत मागितली, परंतु शाळेने मुदत न देता शुल्क भरण्याबाबतची नोटीसच बजावली.
शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यास ठेवले परीक्षेपासून दूर
By admin | Published: March 12, 2016 11:44 PM