नाशिक : तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने संतप्त तरुणीने रुद्रावतार धारण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कार्यालयाच्या आवारात तिने प्रचंड गोंधळ घातल्यामुळे यंत्रणेचीदेखील धावपळ झाली. कार्यालयाच्या आवारात सुमारे तीन तास ठिय्या दिलेल्या या युवतीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेली युवती शीतल पांडे हिने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर तीव्र आक्षेप घेत आपले डिपॉझिट जमा करूनही उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नसल्याचा आरोप करीत चांगलाच गोंधळ घातला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या या तरुणीचे काही कागदपत्रे साक्षांकित नसल्याने तेथील अधिकाऱ्यांनी कागदपत्रे साक्षांकित करवून आणण्यास सांगितले. त्यानुसार साक्षांकन करून आलेली युवती निवडणूक कक्षाकडे गेली असतानाच तीन मिनिटे उशीर झाल्याचे कारण देत कर्मचाºयांनी निवडणूक कक्षाचे द्वार बंद करून घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीचा चांगलाच पारा चढला. तिने कक्षाचे बंद दार उघडण्याचा प्रयत्न करीत आरडोओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी तिला तिच्या पतीने आणि अन्य कर्मचाºयांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता तिने इमारतीच्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी देत तसा प्रयत्नही केल्याने एकच धावपळ उडाली. महिला पोलीस कर्मचाºयांनी तिला खाली आणले मात्र तिने जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याचा आग्रह धरीत कार्यालयाच्या आवारातच ठिय्या दिला. दहा हजार अनामत रक्कम घेतली, मात्र अर्ज घेतला नसल्याचा आक्षेप घेत तिने यावेळी पोलिसांसह अनेकांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सारेच हतबल झाले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनीदेखील तिची समजूत काढली, मात्र ती जिल्हाधिकाºयांच्या भेटीसाठी अडून बसली. सुमारे तीन तास तिचे हे ठिय्या नाट्य सुरू होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आणि या नाट्यावर पडदा पडला.
अर्ज दाखल न झाल्याने तरुणीचा रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:28 AM
तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने संतप्त तरुणीने रुद्रावतार धारण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कार्यालयाच्या आवारात तिने प्रचंड गोंधळ घातल्यामुळे यंत्रणेचीदेखील धावपळ झाली. कार्यालयाच्या आवारात सुमारे तीन तास ठिय्या दिलेल्या या युवतीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.
ठळक मुद्देयंत्रणेची धावपळ : पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न