शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

कठडे नसल्याने गैरसोयसिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पूल धोकेदायक

By admin | Published: August 07, 2016 9:58 PM

साईभक्तांंचा संतप्त सवाल : नदीपात्रात वाहने पडल्यानंतर कठडे बसवणार का?

शैलेश कर्पे ल्ल सिन्नरजागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबईसह उपनगरातून दररोज हजारो वाहने शिर्डीला जात असतात. सदर वाहने ज्या रस्त्याने जातात त्या सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील खोपडी शिवारातील देवनदीचा पूल तुटलेल्या कठड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक बनला आहे. देवनदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. मात्र पुलाचे कठडे दुरुस्त करण्याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील खोपडी शिवारात आम्रपाली हॉटेलजवळ देवनदीत वाहने पडल्यानंतर कठडे दुरुस्त केले जाणार का असा संतप्त सवाल या मार्गाने प्रवास करणारे साईभक्त विचारत आहेत. देवनदीला पूर असल्याने सदर पुलावरून मार्गक्रमण करताना पुलाचे तुटलेले कठडे पाहून हृदयात धस्स झाल्याशिवाय राहात नाही. महाड येथील दुर्दैवी दुर्घटनेमुळे प्रत्येक वाहनचालक व प्रवासी कोणत्याही नदीवरील पुलावरून जाताना त्याकडे बारकाईने पाहणे साहजिक आहे. त्यात नदीला पूर असेल तर प्रवासी वाहनचालकाला वाहन सावकाश चालविण्याचा सल्ला हमखास देतात. अशा परिस्थितीत देवनदीच्या पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत ठेवणे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना न परवडणारी बाब आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून देवनदी दुथडी भरुन वाहत असतांना या तुटलेल्या कठड्यांकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व्हावे ही न पटण्याजोगी बाब आहे.