नाशिक : गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानाच्या कोपऱ्यावर झाडाखाली शिवा कचरू कसबे हा त्याचा भाऊ विकीसोबत जेवणासाठी बसलेला असता तीघा संशयित तरूणांनी तेथे येऊन विकी यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी शिवा याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण करून विकीला दोरीने बांधून लहान टेम्पोमध्ये टाकून भरधाव हनुमानवाडीच्या दिशेने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती.याप्रकरणी शिवा याने सरकारवाडा पोलीसांना माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी सुत्रे फिरवून मोरे मळा परिसर गाठला. येथील झाडाझुडुपांमध्ये विकीस यास बांधून ठेवण्यात आले होते. अपहरण करून त्याचा खून करण्याचा संशयितांनी कट रचला होता; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे हा कट उधळला गेला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरकोळ भांडणाची कु रापत काढून संशयित आरोपी किरण शांताराम डगळे (२८,रा.डोंगरे वसतीगृह मैदानजवळ), छोटू गोनामी पहाडे (४५,रा.सावरकरनगर), चेवीन विश्वनाथ पवार (२७,रा.खामगाव), धनराज हरीभाऊ हरणकोरे (३६,रा.हनुमानवाडी) या चौघांनी विकीचे अपहरण करून खूनाचा कट रचला होता. शिवा याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने तत्काळ सरकारवाडा पिटर मोबाईल गस्ती पथकाच्या वाहनाला ‘कॉल’ दिला. त्यानंतर त्वरित सरकारवाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या उपनिरिक्षक योगीता नारखेडे, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, भगवान गवळी यांच्या पथकाला मिळालेल्या गापेनीय माहितीच्या आधारे तत्काळ हनुमानवाडीच्या दिशेने निघाले. येथील मोरे मळा भागात झाडांमध्ये विकीला दोरीने बांधून ठेवल्याची माहिती खात्रीशिर सुत्रांकहून मिळाली होती. त्यामुळे पथकाने मोरे मळाचा परिसर पिंजून काढत विकीचा शोध घेतला. यावेळी विकी त्याच अवस्थेत त्यांना आढळून आला. पोलिसांनी त्याची सुटका करत गुन्ह्यात वापरलेला लहान टेम्पो, लोखंडी पाईप, दोरी असा सुमारे १ लाखांंचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच चौघा संशयितांनाही अटक केली. या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरिक्षक तपास देवराज बोरसे हे करीत आहेत.दोरीने बांधून फेकणार होते गोदापात्रातसंशायित आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता यामध्ये एका संशयिताच्या मोबाईलवरून दुसऱ्या आरोपीसोबत झालेल्या संवादाच्या रेकॉर्डिंग ध्वनिफीतीवरून विकी यास दोरीने बांधून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेनदीपात्रात फेकून देण्याचा कट रचला गेला होता, असे तपासात उघड झाले.
पोलिसांच्या तत्परतेमुळे खूनाचा कट उधळला; संशयित चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 5:14 PM
तीघा संशयित तरूणांनी तेथे येऊन विकी यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी शिवा याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण करून विकीला दोरीने बांधून लहान टेम्पोमध्ये टाकून भरधाव हनुमानवाडीच्या दिशेने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती.
ठळक मुद्देझाडाझुडुपांमध्ये विकीस यास बांधून ठेवण्यात आले होते.दोरीने बांधून फेकणार होते गोदापात्रात