शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पडूनपदे मंजूर झाल्याने आरोग्य केंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:50 AM

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह निमगावमढ, एरंडगाव व देवठाण ही उपकेंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देयेवला : कर्मचाºयांअभावी बांधलेली इमारत अनेक वर्षे कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह निमगावमढ, एरंडगाव व देवठाण ही उपकेंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील निमगावमढ, एरंडगाव व देवठाण येथे उपकेंद्रांच्या इमारती बांधून पूर्ण झालेल्या होत्या. मात्र या आरोग्य संस्थेकरिता आरोग्य कर्मचाºयांच्या पदांचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. त्यामुळे इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही या आरोग्य संस्था कार्यान्वित झालेल्या नव्हत्या. पदांचा आकृतिबंध शासनाने मंजूर न केल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सुसज्ज इमारती गेल्या अनेक वर्षांपासून विनावापर पडून होत्या.यासाठी छगन भुजबळ यांनी अनेकदा लेखीपत्र देऊन पदांचा आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्थलांतरित प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे ते ग्रामपंचायतीने दिलेल्या तात्पुरत्या जागेत सुरू होते.भुजबळ यांनी प्रयत्न करून त्यासाठी नवीन इमारत मंजूर करून घेतली व या इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर सध्या ग्रामपंचायतीच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेले आरोग्य केंद्र हे नवीन इमारतीत कार्यान्वित होणार आहे. शासनाने राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्यसहायक, परिचारिका यांच्यासह नऊ तांत्रिक, तर एक अतांत्रिक याप्रमाणे १५ पदांना मंजुरी दिली आहे.

लवकरच या संस्थांचे लोकार्पण

निमगावमढ, एरंडगाव व देवठाण या उपकेंद्राकरिता प्रत्येकी एक स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी आणि अंशकालीन स्त्री परिचर अशा एकूण प्रत्येकी तीन पदांना मंजुरी दिली आहे.

राजापूर, निमगावमढ, एरंडगाव व देवठाण येथील आरोग्य संस्थाच्या इमारतींचे उद््घाटन करून या संस्था कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे लवकरच या संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांचे स्वीय सचिव बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले.