शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

देवळा बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

By admin | Published: July 15, 2017 1:00 AM

देवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण अधिकारी यामिनी जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले तालुक्याचे गाव आहे. येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. देवळा बसस्थानकावर दिवसभरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ये - जा करतात. शौचालय नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महीलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था परिवहन विभागाने केलेली नाही. शौचालयांची त्वरित दुरुस्ती करून नवीन शोषखड्डा तयार करावा, नदीपात्रात जाणारे सांडपाणी त्यात टाकावे व परिसराची स्वच्छता नियमतिपणे करावी. तसेच प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय परिवहन विभागाने करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वृषाली अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक अतुल पवार, बाळासाहेब अहेर आदी नगरसेवकांनी केली आहे. स्वच्छ व सुंदर देवळा ही संकल्पना साकार करण्यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरात पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण आदी शहर सुशोभिकरणाची काही कामे पूर्ण केली आहेत. बसस्थानकाजवळ नदीकाठावर रस्ता संरक्षण भिंत बांधकाम सुरू आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बसस्थानकावरील अस्वच्छता नदीपात्राच्या परिसराच्या सौंदर्यास तसेच आरोग्यासाठी बाधक ठरत आहे.अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीतीदेवळा बसस्थानकावरील स्वच्छतागृह व शौचालयांची अवस्था दयनीय झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. शौचालयांचे बांधकाम जीर्ण झाले असून, शोषखड्डा पूर्णपणे भरला आहे. शोषखड्ड्यातील सांडपाणी कोलती नदीपात्रात येऊ लागल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार या नदीपात्रात भरतो.  नदीपात्रालगतच देवळा शहराचे ग्रामदैवत दुर्गामातेचे मंदिर तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. यामुळे येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. मंदिरात येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी सहन करावी लागते. आठवडे बाजारात या सांडपाण्याशेजारीच खाद्य व फळविक्रेते आपली दुकाने लावतात. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.