देवगाव : सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याने उत्पादकांत समाधान व्यक्त होत आहे.मागील महिन्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे देवगाव परिसरातील गावरान आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पावसामुळे ऐन बहरात आलेल्या आंब्याचा मोहोर काळा पडून गळायला सुरुवात झाली होती. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहोराला उतरती कळा लागली होती. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने पुन्हा एकदा पाणी फेरले होते. नुकतीच कुठे आंब्याला मोहोर फुलायला सुरुवात झाली होती. आंब्याचा मोहोर बाहेर पडतो न पडतो तोच ढगाळ हवामानाचा फटका आंब्यांना बसला होता. त्यात तब्बल दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळल्याने आंब्याचा मोहोर गळून पडल्याने शेतकरी धास्तावला होता.साधारणतः डिसेंबर-जानेवारी महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहोर फुलण्यास सुरुवात होते. मोहोराला पोषक अशा थंडीचे वातावरण लाभल्यास मोहोर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो. सद्य:स्थितीत आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कडाक्याच्या थंडीने आंब्याच्या मोहोराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.मधमाशांचे काम महत्त्वाचेआंब्याला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून बहर लागला आहे. सध्याचे वातावरण मोहोर टिकण्यासाठी पोषक आहे. आंब्याला आलेला मोहोर टिकविण्यासाठी मधमाशा महत्त्वाचे काम करीत असतात.
कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याच्या मोहोराला नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 8:31 PM
देवगाव : सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याने उत्पादकांत समाधान व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देआंबा बहरला : थंड वातावरणाचा फायदा