नांदगाव : नांदगाव आगाराच्या बसेस वेळेवर सुटत नाहीत. अनेकदा रद्द होतात. या लौकिकात अलीकडे रस्त्यावर बंद पडणाºया बसेसची भर पडली आहे. एकाच दिवसात नाशिक या वर्दळीच्या मार्गावर तीन बसेस नादुरु स्त होऊन बंद पडल्याने प्रवाश्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गुरु कृपा नगरात राहणारे संजय शर्मा सोमवारी सकाळी कामानिमित्त सकाळी सात वाजेच्या नांदगाव- नाशिक (बस क्र . एमएच १४ बीटी ०७७८) बसने नाशिकला जाण्यासाठी निघाले. सुरवातीपासून आवाज करणारी ही बस जेमतेम चांदवड (५८ किमी) येथे पोहोचली. त्याठिकाणी बस नादुरु स्त झाल्याने पुढे जाणार नाही असे चालकाने जाहीर केले. इतर आगाराच्या बस वाहकांच्या विनवण्या करून तासभर ताटकळलेले प्रवासी मजल दरमजल करत पुढील प्रवासाला निघाले. नांदगाव आगाराची दुसरी एमएच १४ बीटी ०४८७ बस दुपारी चार वाजता नांदगावहून नाशिकला निघाली. ती ६५ किमीचा प्रवास करून वडाळी येथे राष्ट्रीय महामार्गावर बंद पडली. उन्हाचे चटके खात रस्त्यावर उतरून पुन: एकदा दुसºया आगाराच्या बसेसना हात देत प्रवासी नांदगाव आगाराची कर्मकहाणी सांगत इतर बसमध्ये तिकिटे दाखवून उसन्या प्रवासाला निघाले. या दरम्यान दुपारी तीन वाजता नांदगाव आगाराची नाशिकहून नांदगावकडे येणारी बस क्र . एमएच ०७ सीएच ९३३९ ही बस पिंपळगाव नाका ते चांदवड या रस्त्यावर पाचोरा फाटा येथे फेल झाली. सकाळी सात वाजेच्या बसचा अनुभव गाठीशी असलेले शर्मा याच बसमधून नांदगावला जड सामान घेऊन निघाले होते. चार वाजता बंद पडलेल्या बससाठी पिंपळगाव आगाराचे यांत्रिकी पथक अडीच तासानंतर आले. त्यांनी बस दुरु स्तीला असमर्थता दर्शवून तिला ‘टोचन’’ करून आगारात नेले. बुडणाºया जहाजात जसे कोणीही थांबत नाही. तसे यावेळी ही प्रवासी सवयीने.... जमेल तसे मिळेल त्या बसने उभे राहून धक्का बुक्की खात उशिराने नांदगावला गेले.
नांदगाव आगाराच्या आजारी बसेसमुळे प्रवाश्यांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:35 PM