सप्तशृंगगड :लागोपाठ पाच ते सहा दिवस सलग सूट्टी आल्याने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व शाळा बॅकांना सूट्या आल्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सप्तशृंगगडावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच देवी दर्शनासाठी व फनिक्यूलर ट्रॉलीचा आनंद घेण्यासाठी गर्दी झाली आहे. गूजरात,मध्ये प्रदेश, जळगाव, धूळे,नदूंरबार,राजस्थान,ईदोर,उत्तर प्रदेश, मूबंई,कर्नाटक, या ठीकाणाहून भाविकांचा गर्दीचा ओघ सूरू आहे.फर्निक्यूलर ट्रॉली मधील कूठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने येथील नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दोन दोन तास भर तप्त ऊन्हांत ऊभे राहून भाविकांना ट्रॉलीचे तिकीट काढायला ऊभे राहावे लागत आहे. तिकीट काढण्याच्या ठीकाणी कूठलाही ( सावलीसाठी) निवारा शेड नसल्याने काही भाविकांना चक्कर येणे, पोटात मळमळणे,असे प्रकार घहत असल्याने भाविक सतांप व्यक्त करतांना दिसत होते.तसेच ट्रॉली मध्ये बसण्यापूर्वी तेथील सभागृहात े चार ते पाच तास उभे राहून भाविकांना प्रतिक्षा करावी आहे. येथे बसण्यासाठी खुर्च्या,सतरंज्या अशी कूठलीही व्यवस्था नसल्याने बालगोपाळांचे व वयोवृद्ध महिला व पूरूषांचे ताटकळत ऊभे रहावे लागल्याने त्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे काही भाविकांनी काढलेले तिकिट परत देऊन पैसे परत घेतले. आणि पारंपारिक रस्ता म्हणजे थेट पहिल्या पायरीवंरून जाण्याचा निर्णय घेतला. प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने फनिक्यूलर ट्रॉलीचा गेट बंद करण्यात आला होता. येथे कूठलेच नियोजन नसल्याने भाविकांनी आपला सतांप व्यक्त केला.बोल अंबा माता की जय ,परशूराम बाला की जय,जय माता दी,अशा घोषणा देत सर्व गड दूमदूमून गेला होता. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापणाने गर्दीचे चागंले नियोजन केल्याचे आढळले. टप्या टप्याने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होत.े तीन ते चार किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दूतर्फा वाहने लागली होती. भर ऊन्हांत तीव्र चटके अगांवर सोसत भाविक तीन ते चार किलोमीटर पर्यंत पायी चालत येऊन देवी दर्शनासाठी येत होते. गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने काही भाविक दर्शन न करताच माघारी फिरले. तसेच गडावर रस्त्याच्या दूतर्फा वाहनांच्या लांब च्या लांबच रांगा लागल्याने सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती.तसेच सप्तशृंगगडावर पोलीस बंदोबस्त कमी असल्याने चोरांनी आपला डाव साधत आठ ते दहा भाविकांचे मोबाईल व पैसे पॉकेट चोरीला गेले आहेत.नाशिक वरून सप्तशृंगगडावर जाण्यासाठी व येण्यासाठी एस टी बस कमी प्रमाणात असल्याने व नाशिकला जाण्यासाठी सायंकाळची शेवटची साडेपाचाची फक्त एकच गाडी असल्याने प्रवाशांचे आतोनात हाल होतात. नांदूरी ते सप्तशृंगगडावर जाण्यासाठी केवळ एकच बस असल्याने खाजगी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची चांगलीच चगंळ होत आहे. यामुळे अव्वा चे स्व्वा भाडे भाविकाकडून आकारले जात आह.े सूट्या च्या काळात गर्दी असल्या कारणाने ट्रस्ट चे रूम व स्थानिक लॉजिगं हाऊस फूल झाल्याने भाविकांचे हाल होत आहेत. असल्याने भाविक नांदूरी, वणी,नाशिक या ठिकाणी नाईलाजाने मूक्कामी राहण्यासाठी जावे लागत आहे-----------------------------------------------------------------(1)फर्निक्यूलर ट्रॉली मध्ये जाण्यासाठी ताटकळत ऊभे राहीलेले (११ट्रॉली)(११ट्रॉली०१)
सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भक्तांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 3:28 PM
सप्तशृंगगड : लागोपाठ पाच ते सहा दिवस सलग सूट्टी आल्याने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व शाळा बॅकांना सूट्या आल्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सप्तशृंगगडावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच देवी दर्शनासाठी व फनिक्यूलर ट्रॉलीचा आनंद घेण्यासाठी गर्दी झाली आहे. गूजरात,मध्ये प्रदेश, जळगाव, धूळे,नदूंरबार,राजस्थान,ईदोर,उत्तर प्रदेश, मूबंई,कर्नाटक, या ठीकाणाहून भाविकांचा गर्दीचा ओघ सूरू आहे.
ठळक मुद्देदिवाळी सूट्टी निमित्त भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत आहे. प्रत्येक भाविक फर्निक्यूलर ट्रॉली मध्ये बसून दर्शनाला जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सर्व भाविकांनी त्या ठीकाणी एकच गर्दी केली आहे.